◼️गर्दी ची अंधश्रद्धा

◼️गर्दी ची अंधश्रद्धा

          ज्या गोष्टीच्या आहारी गेल्यामुळे मानवी जीवनास कुठलाही लाभ नाही उलट हानीच आहे, असे विज्ञान सांगते तरीही त्या गोष्टीपासून काहीतरी फायदाच होतो अशी श्रद्धा बाळगणे आणि त्याच्या आहारी जाणे म्हणजे अंधश्रद्धा.

          अशीच काहीशी व्याख्या अंधश्रद्धेची केली जाते. मग दारू ही मानवी स्वास्थास हानिकारक आहे. असे विज्ञान सांगते. नव्हे त्यामुळे मानवी विचार शक्तीचे अधःपतन होते असेच या चळवळीतील महापुरुषांचे म्हणणे आहे. मग तरीही दारू पिल्याने स्टॅमिना येतो, जोश वाढतो अशी श्रद्धा बाळगून ती सेवन करणे ही अंधश्रद्धा नव्हे काय? आणि ती सेवन करणारे विज्ञानवादी कसे? हाच प्रश्न तंबाखू , बिडी ,सिगरेट बाबतही विचारता येईल. पण यावर पुरोगामी विचारांची चुप्पी असते.

            विषय निघण्याचे कारण, की सम्पूर्ण जग कोरोनाचा सामना करतोय. तरीही काल देशाचा महसूल बुडतोय  म्हणून दारू दुकानाला परवानगी दिली. झुंबळ उडाली. लॉकडाऊनचे सारे नियम धाब्यावर बसविल्या गेले. जणूकाही दारू हाच जीवनमरणाचा प्रश्न होता.  पण आश्चर्य पाहा एकाही पुरोगामी कार्यकर्त्यांनी सरकारने का दिली दारू दुकानाला परवानगी? महसूल महत्त्वाचा की आरोग्य ? म्हणून सरकारला प्रश्न विचारला नाही. की कुणी त्याचा निषेधही केला नाही. कारण दारूमुळे स्टॅमिना येतो म्हणणाऱ्या अंधश्रद्ध जमातीचीे ही पिलावडं आहेत. हिच गर्दी मंदिरांपुढे झाली असती तर चर्चेचा आगडोंब उसळला असता. सरकारला धर्मवादी म्हणून जाब विचारला गेला असता. पण आता बरेच (सारेच नव्हे) बुद्धीवादी शांत आहेत. आणि कुठंही थोडं खट्ट झालं की अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणून त्याच्या निर्मूलनासाठी ओरडणारेही गप्प आहेत. कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची वर्तुळं प्रत्येकांनी आपापल्याला सोयीनुसार आखली आहेत. कालची बेवड्यांची गर्दी त्याचेच उदाहरण आहे. 


                   🍁 follow us on Instagram

Comments

Popular posts from this blog

◼️पोटावर झोपणे आरोग्यास घातक

◼️किसी को कोई फर्क पडा क्या ?...