◼️पोटावर झोपणे आरोग्यास घातक

      
            बहुतांश लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते. मात्र, ही सवय आरोग्याच्या कित्येक समस्या निर्माण करू शकते. पोटावर झोपल्याने शरीराच्या रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. सोबतच या पोझिशनने बॉडी पोश्चर नैसर्गिकरीत्या राहत नाही, ज्यामुळे कित्येकदा बॉडी पेन देखील होते. अशा अनेक समस्या आहेत, ज्या पोटावर झोपल्याने उद्भवतात. त्याबाबत आज जाणून घेऊया.

📌 पोटावर झोपल्याने खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचत नाहीत, त्यामुळे अपचनाच्या समस्या निर्माण होतात.

📌 पोटावर झोपल्याने मान वाकडी होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन मेंदूला रक्तपुरवठा कमी पडतो, त्यामुळे डोके दुखू लागते.

📌 पोटावर झोपल्याने चेहरा दाबला जातो आणि चेहऱ्याच्या स्किनला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.
त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि पिंपल्स निर्माण होतात.

📌 पोटावर झोपल्याने शरीराला हाडे योग्य पोझिशनमध्ये राहत नाहीत, म्हणून जॉइंट पेनच्या समस्या निर्माण होतात.

📌 पोटावर झोपल्याने आपल्या पाठीचा कणा नैसर्गिक शेपमध्ये राहत नाही. त्यामुळे बैंक पेनची समस्या निर्माण होते.

📌 पोटावर झोपल्याने संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण योग्य प्रकारे होत नाही. यामुळे मसल्सचे दुखणे सुरू होते.

 📌 पोटावर झोपल्याने मानेच्या मसल्समध्ये ताण निर्माण होतो. त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया व्यवस्थित होत नाही आणि मानेचे दुखणे सुरू होते.
         
                                       
                 🍁 Follow us on Instagram

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

◼️गर्दी ची अंधश्रद्धा

◼️किसी को कोई फर्क पडा क्या ?...