◼️मग सलाम कोणाला?

मित्रा सलाम!

माझ्या एका विद्वान मित्राने, 'चिनसारखी प्रगती करायला भारताला अजून पाचशे वर्षे लागतील. चीनच्या टेक्नॉलॉजीला तोड नाही.' असे म्हणत चीनच्या हुशारीला सलाम केले आहे.

माझ्या या विचारवन्त मित्रास त्रिवार सलाम!

कारण...

चिननेच कोरोना व्हायरस चा शोध लावून सर्वांना घरी बसवलं. जगाला महामारीच्या खाईत ढकलला, आणि आपण मात्र मृतांच्या टाळूवरील लोण्याचा व्यापार करतोय.

विज्ञान हे शांतीसाठी हवे असे बुद्ध सांगतात. म्हणून देश टेक्नॉलॉजीत किती पुढारी याला महत्त्व आहेच.

पण त्याहीपेक्षा त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग जगद्कल्याणासाठी होतोय की विनाशासाठी? यालाही दसपट महत्त्व आहे.

टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी स्वतःच्या शाळा सुरू केल्या आणि जगातल्या बहुजनांच्या पोरांना घरी बसवलं. आपणच म्हणतो ना ब्राम्हण हुशार होते पण त्यांनी हुशारीचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केला. मग त्या चीनच्या जागतिक ब्राह्मण्यवादाला तुम्ही सलाम करता? मान गये.

मान्य आहे, आपण पाचशे वर्षे मागे आहोत.

पण जगभर महामारी पसरवणाऱ्या चीन च्या हुशारीला सलाम करायचं की त्या रोग और जगाला हायड्रोक्सी क्लोरोक्वीन औषध पुरविणाऱ्या भारताला सलाम करायचं हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. एक मात्र खरं चीनसारखा हत्यारा देश व्हायला आपल्याला अनंत वर्ष लागतील पण आपण होणार नाही. कारण हा लोकशाहीचा देश आहे. लोकशाही गुंडाळून आजन्म एकाच राष्ट्राध्यक्ष राहील अशी घटनात्मक तरतूद करून घेतलेला हुकूमशहा इथे राज्य करीत नाही.


भारतात आतंकवादी मारला गेल्यास मानवी अधिकारासाठी टाहो फोडणारी बुद्धिजीवींनी चीनच्या विनाशी टेक्नॉलॉजी ला सलाम जरूर करावं पण त्याच बरोबर चीनला हेही विचार...

चीनमध्ये अजूनही साम्यवादी (कम्युनिस्ट) पक्षाची एकसूत्री दडपशाही का चालते?

तिथे अजूनही दुसरा राजकीय पक्ष का अस्तित्वात का येऊ शकला नाही?

तेथील खेड्यातील लोकांना मतदानाचा अधिकार का नाही?

चौथ्या आणि पाचव्या स्तरावरील सामान्य जणांचे प्रतिनिधी निवडतांना प्रत्यक्ष निवडणुका न घेता राजपक्षाच्या मर्जीतील लोकांची को वर्णी लावल्या जाते.

आजन्म एकच राष्ट्राध्यक्ष ही महात्मा बुद्धाला अपेक्षित लोकशाही आहे का?

राष्ट्राध्यक्षांचे भाषण ऐकणे व त्यांचे चरित्र वाचणे शालेय विद्यार्थ्यांना बंधनकारक कसे?

पण नाही. आपले बुद्धिवादी असे प्रश्न विचारणार नाहीत. भारतीय गोमूत्र औषधी कसे? असे ठासून विचारणारे पुरोगामी अशावेळी चिनी वटवाघळं आणि किड्या मुंग्यांचे काड्या पासून बनलेल्या चायनीज व्हिस्कीच्या गुळण्या करून गप्प बसतात.

आणि गंमत बघा...

चीन हा ९१% बौद्ध धम्मीय देश आहे. पण तिथे अजूनही भगवान बुद्धांना अपेक्षित लोकशाही तेथील कम्युनिष्टांनी रुजू दिली नाही.

भारत हा बहुसंख्य हिंदूंचा देश पण बुद्ध विचारांनी प्रेरित असणारे बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान आपण स्वीकारले आहे.

आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही इथे नांदत आहे. टेक्नॉलॉजी पाचशे वर्षे मागे असेलही पण आपले संशोधक मानवी संहार करणारा व्हायरस कधीही शोधणार नाहीत.

फ़क्त भारतातच शत्रूराष्ट्राला सलाम करता येते.

त्यामुळे सलाम नक्की करा...

पण,

तुमचे सलाम मिळविण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञ विनाशक व्हायरस व साम्राज्य विस्तारासाठी स्त्री कधीही बनविणार नाहीत.

....म्हणून सलाम कुणाला करायचं आपण ठरवा!

                              -योग किशोर उरकुंडवार
                   🍁follow us on Instagram
                 


Comments

Popular posts from this blog

◼️गर्दी ची अंधश्रद्धा

◼️पोटावर झोपणे आरोग्यास घातक

◼️किसी को कोई फर्क पडा क्या ?...