⬛नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
◼️नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. दे शातील शिक्षण व्यवस्थेत या धोरणा अंतर्गत अमूलाग्र बदल केले जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा अधिकार (RTE- Right to Education) या कायद्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. तर दहावी-बारावी बोर्डाचे महत्त्वही कमी केले जाणार आहे. विशेष म्हणजे इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम केले जाईल. ( Cabinet under PM Narendra Modi gives approval to New Education Policy) नव्या धोरणाच्या मसुद्यात मुलांच्या वयाऐवजी विकासाच्या टप्प्यांवर आधारित 5 + 3 + 3 + 4 असा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक रचना ◼️ 5+3+3+4 पॅटर्न आहे तरी कसा ? 1) 5 वर्षे - वय 3-8 वर्षे : पूर्व प्राथमिक तीन वर्षे आणि इयत्ता 1 ली 2 री 2) 3 वर्षे - वय 8-11 वर्षे : प्राथमिक शिक्षण - इयत्ता 3री ते 5वी 3) 3 वर्षे - वय 11-14 वर्षे : पूर्व माध्यमिक शिक्षण - इयत्ता 6वी ते 8वी 4) 4 वर्षे - वय 14-18 वर्षे : माध्यमिक शिक्षण - इयत्ता 9वी ते 12 वी ◼️ महत्त्वाचे नऊ मुद्दे- 1) अंडर ग्रॅज्युएट महाविद...