◼️मी बघितलेला पक्षी...


      काही दिवसांपूर्वी श्यामला कुलकर्णी यांचं एक पुस्तक वाचलं, तिथं एका पक्षाचं वर्णन केले होते. आणि लेखिकेनी आपला अनुभव असा मांडला की ते मनोमनी विचारात प्रकट होऊ लागले...
       
       तुम्ही सर्वांनी मोर पाहिला असेलच. मोराइतका सुरेख पक्षी जगात नाही. एकदा त्याने पिसारा फुलवला, की आपण पाहतच राहतो. असा सप्तरंगी पिसारा पाहून आपण आश्चर्यचकित होतो.

       अशा सुंदर पक्ष्याला १९६२ साली भारताने आपला 'राष्ट्रीय पक्षी' म्हणून खूप मानाचे स्थान मिळवून दिले. सगळ्या जगाने ते मान्य केले; कारण मोराचे सौंदर्य, मोराने नाचायला सुरुवात केली, की तो पिसारा फुलवतो. ही मोरपिसे, प्रत्येक पिसावर मध्यभागी असलेला डोळा, आजूबाजूने काळी, जांभळी पिसे यांचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील.
 
 
       मोराच्या डोक्यावर तुरा असतो. मोर चालायला लागला, की त्याची गर्द निळी मान एकसारखी डोलत राहते. पोरांच्या चालण्यात एक प्रकारचा डौल आहे. मोर पाहणाच्याला चकित करतो आणि लोक पाहतच राहतात. आकाशात ढग गोळा झाले, की मोर नाचायला सुरुवात करतात. पक्षी आणि निसर्ग यांचे फार जवळचे नाते आहे. नदीकाठी, सखल भागात, झाडाझुडपांत मोर राहतो. मोराचे घरटे मोठे असते. ते गवताचे बनवलेले असते. या गवती घरात मोर आणि लांडोर राहतात. ज्येष्ठ ते कार्तिक या महिन्यांत लांडोर सर ते पंधरा अंडी घालते. ही अंडी खडबडीत असतात. त्यांतून जी पिल्ले बाहेर पडतात, ती मात्र अतिशय मऊ, मुलायम असतात. लांडोर अंड्यांची खूप काळजी घेते. मोर मात्र स्वैर हिंडत असतो.मोर कधी एकटे राहत नाहीत. ते टोळ्या करून राहतात आणि दिवसभर भटकून आपले भक्ष्य मिळवतात. रात्री गर्द झुडपांतील आपल्या घराकडे परत येतात.

       मोरांना पकडणे तसे सोपे नसते. मोर फार जोरात पळतात.

       मोराच्या नाचण्याला 'मयूर-नृत्य' म्हणतात. कथ्थक या नृत्यप्रकारात 'मयूरनृत्य' प्रसिद्ध आहे. मयूरनृत्यामध्ये शरीराला मोरासारखा बाक वाटते. देऊन नृत्य केले जाते, तेव्हा मोरच नाचतोय असे वाटते.

       मोराचे देखणे रूप पाहून मोगल बादशहा शाहजहानने आपल्या सिंहासनावर मोराचे चित्र करून त्यास 'मयुर सिंहासन' हे नाव दिले. श्रीकृष्णाने आपल्या मुकुटावर मोराचे पीस बसवून  मोराचा मोठा गौरव केला आहे.

        जेव्हा सिकंदर भारतात आला, तेव्हा मोरांचा थवा नाच करताना बघून त्याचे डोळे दिपले. भान हरपले. त्याने आपल्या दैनंदिनीत मोराचा उल्लेख केला आहे. भारतीय शिल्पकला (झाडा वरील कोरीव काम), चित्रकला, कलाकुसरीच्या वस्तू या सर्वावर मोराचे चित्र आढळते. पैठणी, शालूसारख्या वस्त्रांवर मोर विणलेले असतात. इतकी लोकप्रियता मोराने मिळवली आहे. काही काही राजांनी आपल्या मुद्रांवर मोराचा छाप काढलेला आहे.

       राजस्थानात पुष्कळ मोर आहेत. प्रवासी लोक मोरांना पाहण्यासाठी मुद्दाम जयपूरला जातात. महाराष्ट्रातही बीड जिल्ह्यात नायगाव येथे मयूर अभयारण्य आहे.

       पिसारा फुलवून हे मोर जेव्हा एकदम नाचायला लागतात, तेव्हा सप्तरंग उधळणारी इंद्रधनुष्याचीच आठवण होते. मोराचा पिसारा नुसता चमकत असतो. डुलत असतो. मन मोहून टाकतो.

       त्यात हिरवा, जांभळा, निळा, पिवळा या रंगांचे मनोहर मिश्रण असते.

       अशा सुंदर मोराची आपला 'राष्ट्रीय पक्षी' म्हणून निवड झाली, ही अभिमानाची गोष्ट आहे.

                                   
                  🍁Follow us on Instagram

Comments

Popular posts from this blog

◼️गर्दी ची अंधश्रद्धा

◼️पोटावर झोपणे आरोग्यास घातक

◼️किसी को कोई फर्क पडा क्या ?...